ताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

खासदार उदयनराजे भोसलेंचा विसर्जन मिरवणूकीत फ्लाईंग किस अन् कॉलर… व्हिडिओ पहा

सातारा प्रतिनिधी वैभव बोडके
साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे कायम आपल्या अनोख्या शैलीतून सर्वत्र चर्चेत असतात. सातारा शहरात रात्री निघालेल्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. यावेळी राजेंनी चाहत्यांच्या विनंती नंतर पुन्हा एकदा कॉलर उडवली. तसेच मै हु डॉन या गाण्यावर राजे थिरकलेले पाहायला मिळाले. सध्या राजेंचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होवू लागला आहे.

सातारा शहरात अनंत चतुर्थीला घरगुती गणपती सोबत मंडळाचे गणपतीही विसर्जित करण्यात आले. शहरातील मंडळाच्या मूर्तीची विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होती. छ. उदयनराजे यांनी या मिरवणुका हजेरी लावली अन् पुन्हा एकदा आपली स्टाईल तरूणाईच्या आग्रहाखातर मारली. राजे येताच तरूणाईमध्ये जल्लोष दिसून आला. तरूणांनी मैं हू डाॅन, आले रे आले राजे तसेच गणपती बाप्पांची गाणी लावत डान्सचा आग्रह केला. राजेंनी आपल्या खास शैलीत डान्स करत पुन्हा काॅलर उडवली.

छत्रपती उदयनराजे यांचा गणपती मिरवणुकीतील व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होवू लागला आहे. साताऱ्यात गणेश भक्तांनी जल्लोषात गणरायाला निरोप दिला. शहरातील मुख्य रस्ते गणेश मंडळांच्या मिरवणुकीमुळे गर्दीने फुलून गेले होते. झांज- पथक, साऊंड सिस्टिमवर तरूणाई थिरकताना पहायला मिळाली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker