ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यविधानसभा 2024सातारा

कराड उत्तरला भाजपाकडे एकच उत्तर ”रामकृष्ण वेताळ”

विशाल वामनराव पाटील

कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडी आणि महायुतीत सामना होणार असून तो दुरंगी की तिरंगी याबाबत चांगल्याच चर्चा रंगू लागल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री, विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील असणार हे निश्चित आहे. महायुतीतून अद्याप उमेदवारावर शिक्कामोर्तब झाला नाही. गेल्या निवडणुकीचा मागोवा पाहिल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी भाजपाने कराड भागातील उमेदवार रिंगणात उतरणे गरजेचे असल्याचे जाणकार सांगत आहेत. अशा परिस्थितीत भाजपाला किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ”रामकृष्ण वेताळ” हे एकच उत्तर दिसत आहे.

कराड उत्तर विधानसभा मतदार संघ कराड, खटाव, कोरेगाव आणि सातारा या चार तालुक्यात विखुरलेला आहे. या मतदार संघाची पुर्नरचना 2009 साली झाली असून सलग तीनवेळा याठिकाणी आ. बाळासाहेब पाटील यांनी आपले निर्विवाद वर्चस्व ठेवले आहे. आ. पाटील यांच्या विरोधात या मतदार संघात विजयाची ताकद असून ती ऐनवेळी विभागली जाते अन् विजय सोपा होतो, हा इतिहास आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम काॅंग्रेस, शिवसेना असा प्रवास करून आले आहेत. मनोज घोरपडे हे समाजवादी कामगार पक्ष, अपक्ष असे निवडणुकीला सामोरे गेले आहेत. भाजपातील मनोज घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचे साैख्य कसे आहे, हे कराड उत्तरमधील जनता जाणून आहे. गेल्या दोन निवडणुकात जिल्हाध्यक्ष आणि मनोज घोरपडे हे एकमेकां विरोधात शड्डू ठोकून उभे होते. आता दोघे एकाच पक्षात असले तरी लोकसभेचा चमत्कार घडवतील का?

भाजपाला कराड उत्तरचा आ. बाळासाहेब पाटलांचा गड रोखायचा आहे. आ. पाटील यांच्याकडे खटाव- सातारा तालुक्यातून मोठे चर्चेतले पुढारी नसले तरी साखर कारखाना आणि बेरजेच्या राजकारणामुळे मोठा फटका बसलेला दिसला नाही. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे जिल्हाध्यक्ष सुनील माने सोबत आहेत. कराड उत्तर होमपीच असल्याने नेहमीच आ. पाटील आघाडीवर राहिले आहेत. भाजपाला नेहमीच आ. पाटील यांच्या होमपीचवरूनच धोबीपछाड मिळाली आहे.  त्यामुळे भाजपाला गड रोखायचा असेल तर कराड तालुक्यातून उमेदवार द्यावा, लागणार हे निश्चित.

आ. बाळासाहेब पाटील यांना रोखण्यासाठी लोकसभेच्या आकडेवारी आणि घेतलेले मतदान यांच्या जोरावर यश आपलेच या अविर्भात भाजपाला न परवडणारे आहे. कराड तालुक्यातील लोकसभेला उमेदवार नसल्याचा तोटा महाविकास आघाडीला बसला असल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. कराड उत्तर आणि दक्षिण मतदार संघाने महाविकास आघाडीचा उमेदवार कराडचा नसल्याने गादीला मान अन् मतही गादीला दिले. आता आ. पाटील हे कराडचे आहेत. तेव्हा भाजपाने उमेदवारी देताना यांचा विचार करणे गरजेचे आहे. या परिस्थितीचा विचार केल्यास भाजपाला सध्या कराड उत्तरमधून एकच उत्तर आहे, ते म्हणजे ”रामकृष्ण वेताळ”.

2019- आ. बाळासाहेब पाटील- राष्ट्रवादी- 1, 00, 509 (विजयी)
मनोज घोरपडे- अपक्ष- 51, 294 (पराभूत)
धैर्यशील कदम- शिवसेना- 39, 791 (पराभूत)

2014- आ. बाळासाहेब पाटील- राष्ट्रवादी- 78, 324 (विजयी)
मनोज घोरपडे- समाजवादी कामगार पक्ष- 43, 903 (पराभूत)
धैर्यशील कदम- काॅंग्रेस- 57, 817 (पराभूत)

2009- आ. बाळासाहेब पाटील – अपक्ष- 1, 01, 658 (विजयी)
अतुल भोसले – राष्ट्रवादी- 60, 571 (पराभूत)

शंभूराज देसाईंच शक्तिप्रदर्शन, पाटणला विरोधकाचं काय?

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker