कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

बाजार समिती निवडणूक : रयत पॅनेलचा उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा

कराड / कराड शेती उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्व.लोकनेते विलासराव पाटील (काका) रयत पॅनेलच्या  कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. 8 रोजी सायंकाळी 5 वाजता पाचवड फाटा (ता. कराड) येथे आनंद मल्टीपर्पज हॉलमध्ये होणार आहे.

कराड बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू असून दोन गटात निवडणूक होणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे. या निवडणुकीत रयत पॅनेलची भूमिका ठरविण्यासाठी माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस युवा नेते ॲड. उदयसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यास कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस तसेच पाठिंबा देणाऱ्या सहकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

रयत पॅनेलची एक जागा बिनविरोध निवडून आली असून अन्य उमेदवार भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी व आगामी रणनिती ठरविण्यासाठी हा मेळावा होणार आहे. तरी कराड तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close