ओगलेवाडीत रामकृष्ण वेताळ यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचा दिमाखदार सोहळा
देशप्रेम, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रनिष्ठेचा जागर; हजारो हातात डौलाने फडकला तिरंगा

ओगलेवाडी (हॅलो न्यूज) ;- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील ओगलेवाडी येथे भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य आणि दिमाखदार तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. तिरंग्याच्या सन्मानार्थ तसेच विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या मनात देशप्रेम, राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठेची भावना अधिक दृढ व्हावी. या उदात्त हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी, न्यू इंग्लिश स्कूल ओगलेवाडी आणि माध्यमिक विद्यामंदिर हजारमाची येथील शिक्षक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले.
या रॅलीस भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश कुंभार, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, जिल्हा चिटणीस शंकरराव शेजवळ, सुदाम चव्हाण तात्या, संजय पिसाळ, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पडवळ, अनुसूचित जाती मोर्चाचे विलास आटोळे, किसान मोर्चाचे उपाध्यक्ष विकास अण्णा गायकवाड यांच्यासह विजय सावंत, रुक्मिणीताई जाधव, उषाताई नलवडे, अमित पाटील, सागर चव्हाण, वैष्णवी पळसे, राजेंद्र चव्हाण, नवीन जगदाळे, दीपक इंगवले, पिंटू मोरे, बाबुराव चौधरी, बाळासाहेब पोळ, रघुनाथ शेडगे, मुकुंद गोळे, दादासो डुबल, सतीश पवार, राजाराम काटवटे, पितांबर गुरव, मनोज वीर, उपसरपंच सागर हाके, संभाजी कुंभार, विनोद डुबल, मानसिंग मुळीक, अनिल पोळ, कुमार इंगळे, अक्षय नाटकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीदरम्यान लहान मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्यामध्येही राष्ट्रप्रेमाची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो देशाची एकता, अखंडता, शौर्य आणि अभिमानाचे प्रतीक आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठा जागृतीसाठी रॅलीचे आयोजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिष्ठा निर्माण व्हावी. या तिरंगा रॅलीत हजारो विद्यार्थ्यांनी तरुणांनी सहभाग घेतला. यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम राबवत राहणार.
रामकृष्ण वेताळ
प्रदेशाध्यक्ष,भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र



