कला शिक्षक अमर भागवत यांना ‘विवेकरत्न’ गुरुदेव पुरस्कार प्रदान

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या ३९ व्या स्मृतिदिनानिमित्त श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने सन २०२४-२५ चा स्वामी विवेकानंद ‘विवेकरत्न’ गुरुदेव पुरस्कार कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पाटण या माध्यमिक विद्यालयांचे उत्कृष्ट फलक लेखनकार, उत्कृष्ट व्यक्तीचित्रकार, निखळ स्वभाव असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व, विद्यार्थी प्रिय कला शिक्षक अमर भागवत यांना नुकताच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालय, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, पुणेचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे होते. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सहसचिव प्रशासन प्राचार्य सीताराम गवळी, सहसचिव अर्थ प्राचार्य मिलिंद हुजरे, अध्यक्ष विद्या समिती तथा विभाग प्रमुख कोल्हापूर श्रीराम साळुंखे, विभाग प्रमुख रायगड- ठाणे- मुंबई प्राचार्य उत्तम गलांडे, पुणे जिल्हा विभाग प्रमुख प्राचार्य श्री. साकोरे तसेच एस. के. कुंभार, आर. के. भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
विवेकरत्न’ गुरुदेव पुरस्कार मिळाल्याबद्दल कला शिक्षक अमर भागवत यांचे विद्यालयाचे प्राचार्य बी.पी.देसाई, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व आजी- माजी विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.



