कराड शहरात प्रशासन, कृष्णा विद्यापीठ, शाळांत स्वातंत्र्य दिन साजरा

कराड (हॅलो न्यूज) – वसंतगड (ता. कराड) येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या श्री वि. ग. माने हाय. व ज्युनि. कॉलेज, मध्ये भारताचा 80 स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात वंदे मातरम गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सामूहिक वंदे मातरम घेण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक सुनील गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमासाठी चंद्रसेन शिक्षण संस्थेचे सचिव रघुनाथ नलवडे, उपाध्यक्ष महीपती कोकरे, सरपंच एॅड. अमित नलवडे, चंद्रकांत पाटील तानाजीराव वाघमारे, मुख्याध्यापक मंदार दीक्षित, पर्यवेक्षक शिवाजी पाटील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
कृष्णा विश्व विद्यापीठात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
कराड :- कृष्णा विश्व विद्यापीठाच्या प्रांगणात कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहाच्यावतीने ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा उद्योग व शैक्षणिक समूहातील विविध सिक्युरिटी फोर्सच्या जवानांनी व विद्यार्थ्यांनी शानदार ध्वजसंचलन केले. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते व आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर डॉ. सुरेश भोसले यांच्यासोबत आ.डॉ. अतुलबाबा भोसले, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा व उपकुलसचिव एस. ए. माशाळकर यांनी सुरक्षारक्षकांकडून मानवंदना स्वीकारली.
याप्रसंगी सौ. उत्तरा भोसले, सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, डॉ. रजनी गावकर, परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील, संशोधन संचालक (नि. ब्रिगेडियर) डॉ. हिमाश्री, डॉ. डी. के. अगरवाल, डॉ. एस. आर. पाटील, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय कणसे, डॉ. जी. व्ही. रामदास, कराडचे नगरसेवक शिवाजी पवार, जनशक्ती आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, माजी नगरसेवक अतुल शिंदे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड प्रशासनाकडून 80 वा स्वातंत्र्यदिन साजरा
कराड प्रशासकीय इमारतीत भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80 व्या दिनानिमित्त प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील, कराड तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ, नायब तहसीलदार बाबुराव राठोड, बाजीराव पाटील, पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडे, निबंधक अपर्णा यादव, यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, माजी सैनिक, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कराड शहर पोलिस ठाण्यात डीवायएसपी राजश्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
कराड शहर पोलीस ठाण्यात उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 80 व्या दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडून मोठ्या उत्साहात कराड शहर पोलीस ठाण्याच्या आवारात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. डीवायएसपी राजश्री पाटील यांनी पोलीस कर्मचारी अधिकारी तसेच नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या यावेळी शुभेच्छा दिल्या.
कराड नगरपालिकेत नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण
कराड नगरपालिकेत उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष पोपटराव साळुंखे, विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांच्यासह नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांचा नगरपालिकेने सन्मान केला.



