मनोज जरांगे- पाटील यांचे तारुख येथे उत्साहात स्वागत

कराड- पश्चिम महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्वकर्ते मनोजदादा जरांगे पाटील यांचे मौजे तारुख (ता. कराड) येथे परिसरातील मराठा बांधवांकडून अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांचे तारुख येथे आगमन होताच उपस्थित मराठा बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. गावकऱ्यांच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण व पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
गावात दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तारूख गावासह परिसरातील अनेक मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवराज कुराडे पाटील, विवेक कुराडे पाटील, विक्रांत कुराडे पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप पाटील, सरपंच सचिन कुराडे, सुहास पाटील, विक्रम पाटील, दत्ता पाटील, बाळू बापू, सूरज शेवाळे, आबा चोपडे, अंकुश कुराडे, हणमंत भिसे, राजेंद्र सुपनेकर, राम कुराडे, संजूबाबा तसेच तारुख व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.



