Hello News 2026 Ganpati Arati Book
उत्तर महाराष्ट्रताज्या बातम्यानाशिकपश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यशैक्षणिकसातारा

छ. उदयनराजेंनी आ. सत्यजित तांबेंच्या गळ्यात शालीचा फास आवळला

सातारा | नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नूतन अपक्ष आमदार सत्यजित तांबे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सातारा येथे त्यांचे स्वागत भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले. यावेळी मोठ्या उत्साहात दोन्ही नेत्यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.

यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मिश्किल टिप्पणी करताना काँग्रेसला खोचक टोला लगावला. सत्यजित तांबे यांच्या गळ्यात शाल घालताना गळ्याला शालीचा फास आवळला आणि छ. उदयनराजे म्हणाले, आमदार साहेब असाच फास लागला होता, मी नाय बाकीच्यांनी लावला होता.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील घडामोडींवर छत्रपती उदयनराजे भोसले यांची ही कृती फार बोलकी होती. या वाक्यामध्ये उपस्थितांच्यात मोठा हास्या पिकला होता. सातारा येथून सत्यजित तांबे हे पुढे कराडकडे रवाना झाले. त्यांचे तासवडे टोलनाका येथे युवक काँग्रेसचे पदाधिकारी व शिवाजी विद्यापीठ सिनेटचे सदस्य अमित जाधव यांनी स्वागत केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close