kota acadamy karad
अहमदनगरकृषीकोल्हापूरखेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराजकियराज्यसांगलीसातारासोलापूर

बैलगाडा शर्यत : रूस्तम- ए- हिंद स्पर्धेत 19 लाखांचा महिंद्रा थारचा रेठऱ्याचा महिब्या आणि बकासूर ठरला मानकरी

सांगली | विटा- भाळवणी (जि. सांगली) येथे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशनच्या वतीने आयोजित भारतातील सर्वांत मोठ्या रुस्तम- ए-हिंद बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला. या शर्यतीत 19 लाख रूपयांच्या महिंद्रा थार गाडीचा मानकरी कराड तालुक्यातील रेठऱ्याचा महिब्या आणि सचिनशेठ घरात, मोईनशेठ धुमाळ यांचा बकासूर मानकरी ठरला. अत्यंत चुरशीच्या व खचाखच प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानात डोळ्याचे पारणे फेडणारे बैलगाडा मैदान झाले. फायनलच्या चिठ्ठ्या सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते काढण्यात आल्या.

सांगली जिल्ह्यातील या मैदानात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय काका पाटील, खा. श्रीनिवास पाटील, कडेगाव- पलूस मतदार संघाचे आ. विश्वजित कदम, आ. निलेश लंके, पै. संतोष आबा वेताळ, तासगावचे युवा नेते रोहित पाटील, आ, अनिल बाबर, माजी आ. आनंदराव पाटील याच्यासह राज्यातील राजकीय तसेच बैलगाडी शाैकिनांनी मोठी गर्दी केली होती. चंद्रहार पाटील यूथ फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम दोन दिवस घेण्यात आले. प्रेक्षकांसाठी पट्ट्याच्या दोन्ही बाजूला प्रेक्षागॅलरी उभारली आहे. निकालामध्ये कोणताही गोंधळ होऊ नये, म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्याशिवाय आजपर्यंतची मोठा स्क्रीन मैदानावर उभारला आहे. त्याचबरोबर प्रकाश व्यवस्थाही करण्यात आली आहे.

Bullock cart race Thar cart

बैलगाडी शर्यतीतील विजेत्यांची नांव, गाव व बक्षीस पुढीलप्रमाणे ः-
पहिला क्रमांकाचे मानाची गदा, चषक आणि महिंद्रा थार गाडीचा मानकरी सदाभाऊ कदम (रेठरे) यांचा महिब्या, बकासूर ठरला, दुसरा क्रमांक – ट्रॅक्टर आणि चषक- शंभू आणि रोमर बैलजोडी- आरोही मोहन देडगे (नांदेड सिटी), तिसरा क्रमांक- ट्रॅक्टर आणि चषक- वजीर आणि नियादी बैलजोडी- गुड्डी रतन म्हात्रे (सागाव- डोंबवली), चतुर्थ क्रमांक- दुचाकी- निसर्ग गार्डन (कात्रज), पाचवा क्रमांक- दुचाकी- सुर्या आणि रवार बैलजोडी- नियती भिमराव भुतकर (रामुसवाडी), सहावा क्रमांक- दुचाकी रणवीर पाटील (कल्याण),  सातव्या क्रमांक- सर्जा आणि रणवीर बैलजोडी- जावेद मुल्ला (तांबवे) तर सेमी फायनलमधील दुसऱ्या क्रमाकांवर राहिलेल्या गाड्याचा दुसरा अंतिम राऊड घेण्यात आला असून पहिल्या विजेत्यास दुचाकी तर इतरांना रोख रक्कम बक्षीस देण्यात येणार आहे.

Bullock cart race Thar cart

क्वाटंर फायनल- मुकाई प्रसन्न- शंभू बाजी ग्रुप (खडकवासला), पृथ्वीराज सयाजी बाबर (गार्डी), पै. सचिन चव्हाण (वाई), गुड्डी अजय शेठ (गार्डी), समीर महादेव भोईर (मोठागाव), वरूण पाटोळे (मायणी), ज्ञानेश्वरी देवदत्त पाटील (साखराळे)

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close