कराडला प्रवीण दरेकर : विरोधकांसह ठाकरे बंधूवर टीका, सगळं झाल्यावर जागे होतात
किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळांनी केले स्वागत

कराड – जे निर्णय दोन तीन दिवसात केंद्र सरकारने घेतले आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही. कायदा आणून जबरदस्त दंड लावलेला आहे. या संदर्भात 46 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून पंतप्रधान मोदी साहेब यांनी सांगितलेल आहे, की कोणाला सोडणार नाही. याविषयी सरकारक संवदेनशील आहे. मी दाव्याने सांगतो केंद्र सरकार ज्या कारवाया करत आहे, त्यामुळे पुढील आठ दिवसानंतर विद्यार्थी, पालक समाधान व्यक्त करतील, स्वागत करतील. या विषयावर विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण सुरू आहे. आपल्या पक्षाचं, आपलं नेतृत्व संपुष्टात येत आहे ते पुन्हा प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी अशी राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू असल्याची टीका विरोधकांवर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
कराड तालुक्यातील बेलदरे येथे आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हरित महाराष्ट्र- समृध्द महाराष्ट्र अभियान अंतर्गत देशी गोसंवर्धन, वृक्षारोपण अभियान प्रसंगी माध्यमांशी बोलत होते. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, विक्रम पावसकर, अजय पावसकर, एकनाथ बागडी, राहूल यादव, मुकुंद चरेगावकर, शिवाजी जाधव, सुनिल शिंदे आदी उपस्थित होते.
उद्याच्या मुंबई आंदोलना वरून ठाकरे बंधूवर प्रवीण दरेकरांची टीका
दिल्ली आंदोलनात विद्यार्थ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून संपुष्टात येत असलेले आपल्या पक्षाचं, आपल नेतृत्व प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी म्हणून राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरू असल्याची टीका मनसे आणि उबाठा शिवसेना पक्षावर प्रवीण दरेकरांनी केली आहे.
ठाकरे बंधू सगळं झाल्यावर जागे होतात
मुंबईत ठाकरे बंधू संयुक्त मोर्चा काढणार आहेत. त्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. बैल गेला अन् झोपा केला अशा पध्दतीने ठाकरे बंधू सगळं झाल्यावर जागे होतात. ठाकरे बंधूच्या विश्वास अर्हतेला तडा गेला आहे. त्यामुळे त्याच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही.
देवेंद्र फडणवीस पुढील 10 ते 15 वर्ष मुख्यमंत्री
जनता सुज्ञ आहे. या आंदोलनात कोण आगीत तेल टाकत आहे, खतपाणी घालतयं हे जनतेला कळत आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल चरणी भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पांडुरंग चरणी प्रार्थना केली आहे. पुढील 10 ते 15 वर्ष महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस लाभावेत.



