kota acadamy karad
कोल्हापूरखेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

जी एच रायसोनी बॅडमिंटन चैम्पियनशिप : कराडच्या शटलर्स अकॅडमीच्या खेळाडूचे यश

श्रध्दा इंगळे दुहेरी मुकुटची मानकरी, श्रीयांश फणसळकर मुले एकेरीतील विजेता 

सातारा – जिल्हा बॅडमिटन संघटनेच्या वतीने आयोजित जी एच रायसोनी मेमोरियल सातारा जिल्हा बॅडमिंटन चैम्पियनशिप 2026 स्पर्धेत कराडच्या शटलर्स अकॅडमीच्या खेळाडूनी मोठे यश मिळवले. या स्पर्धा वेगवेगळ्या वयोगटात पार पडल्या. कराडमधील श्रध्दा इंगळे हिने दुहेरी विजयी मुकुट मिळवला तर श्रीयांश फणसळकर मुले एकेरीतील तर ओमकार पालकर पुरूष दुहेरीतील विजेते ठरले.

कराडच्या शटलर्स विजेत्या खेळाडूची कामगिरी पुढीलप्रमाणे – श्रद्धा इंगळे, (दुहेरी मुकुट) मुली एकेरी 15 वर्षा खालील आणि मुली एकेरी 17 वर्षा खालील विजेती ठरली. श्रीयांस फणसळकर हा मुले एकेरी 19 वर्ष खालील विजेता ठरला. ओमकार पालकर हे पुरुष एकेरी उपविजेता तर पुरुष दुहेरी विजेते ठरले. पुष्कराज कुलकर्णी पुरुष दुहेरी विजेता ठरला आहे.

निलेश फणसळकर आणि अतुल पाटील यांना पुरुष दुहेरीत उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. पूर्वा कुलकर्णी
महिला एकेरीत उपांत्य फेरीत पोहचली होती. हर्ष पाटील, राजवीर डुबल, वरद कोल्हापूरे , कनक जोशी, अक्षत निकम हे खेळाडूनी उपांत्य पूर्व फेरीपर्यंत मजल मारली. स्पर्धेतील खेळाडूंचे सातारा जिल्हा बॅडमिंटन असो. अध्यक्षा छ. वृषाली राजेभोंसले, उपाध्यक्ष राजदीप माजगावकर, सचिन देशमुख, सुरेश साधले, सचिव सुधाकर शानभाग, मनोज कान्हेरे, विलासराव भगत, नीलेश फणसळकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close