कोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कोल्हापुरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर कराडात पोलिसांचे संचलन

कराड । कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात बुधवारी सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान, रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांनी शहरातून संचलन केले.

कोल्हापूर येथे औरंगजेबाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने आणि काही लोकांनी हे स्टेटस सोशल मिडियावर व्हायरल केल्यानंतर याचे संतप्त पडसाद कोल्हापूर शहरात उमटले. मंगळवारी सकाळपासूनच कोल्हापूर शहरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. दरम्यान, कोल्हापूर बंदची हाक देवू नये असे बैठक घेऊन शांततेचे आवाहन करण्यात आले होते. तरीही कोल्हापुरात मोठा जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तणावाचे लोन कराडमध्ये येऊ नये म्हणून पोलिसांनी खबरदारी घेतली होती. डीवायएसपी अमोल ठाकूर, डीवायएसपी बी.आर.पाटील यांनी मंगळवारी सकाळपासूनच शहरातील प्रमुख ठिकाणी बंदोबस्त वाढवला होता. त्यातच रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिस अधिक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीत कराड शहरातून संचलन करण्यात आले.

यावेळी समीर शेख हातात काठी व डोक्याला हेल्मेट घालून संचलनामध्ये सर्वात पुढे सहभागी झाले होते. त्यांच्याबरोबर डीवायएसपी अमोल ठाकूर, डीवायएसपी बी. आर. पाटील, पोलिस निरिक्षक आनंदराव खोबरे, सपोनि सरोजिनी पाटील यांच्यासह कराड शहर व तालुका पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस जीप, व्हॅन सहभागी झाल्या होत्या. दत्त चौकातून पोलिस संचलनाला सुरुवात झाली. पोलिस जीपवरील सायरन वाजवत हे संचलन मुख्य बाजारपेठेतून करण्यात आले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close