क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

पाटणला पाणीप्रश्नाच्या मोर्चात सहभागी नागरिकास उपनगराध्यक्षांकडून पाईपने मारहाण (Video)

पाटण | पाणी प्रश्नावर पाटण नगरपंचायतीवर बुधवारी झालेल्या मोर्चात सहभागी का झालास म्हणून पाटणच्या उपनगराध्यक्ष व त्यांच्या दोन साथीदारांनी प्रदीप शामराव सुतार (रा. पाटण) यांना जबर मारहाण केल्याची तक्रार पाटण पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या मारहाण प्रकरणी उपनगराध्यक्ष सागर दादासाहेब पोतदार, धनाजी कदम, ओम (सिद्धे) खैरमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मारहाण प्रकरणातील तीन संशयित फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पाटण शहरात मागील काही दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे नळ पाणीपुरवठा बंद झाला असून, कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या कारणामुळे पाटणच्या संतप्त रहिवाशांनी बुधवारी पाटण नगरपंचायतीवर मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी का झाला म्हणून उपाध्यक्ष सागर पोतदार आणि त्यांचे साथीदार धनाजी कदम, ओम (सिद्धे) खैरमोडे या तिघांनी मिळून आज नवीन स्टैंड परिसरातील भारत बाजारसमोर फिर्यादी प्रदीप शामराव सुतार याला गाठून पाइपच्या साह्याने जबर मारहाण केली.

या मारहाणीत प्रदीप सुतार यांच्या डोक्याला, मानेला, हाताला पायाला व मारहाण झाली आहे. त्यांच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कन्हाड येथे पाठविण्यात आले आहे. याबाबत प्रदीप सुतार याने पाटण पोलिसात तक्रार दाखल केली असून, मारहाण प्रकरणातील तिन्ही संशयित फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक विकास पाडळे यांनी सांगितले. या गुन्ह्याप्रकरणी पोलिस निरीक्षक विकास पाडळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील अधिक तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close