kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसांगलीसातारा

कराडच्या सल्या चेप्याचा साथीदार टारझनचा खून : अनैतिक संबधातून कोयत्याने वार

सांगली | पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड सचिन पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन (वय 44, रा. पारगाव खंडाळा, जि. सातारा) याचा सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास कोयत्याने वार करून खून करण्यात आला. हा खून अनैतिक संबंधाच्या कारणातून झाल्याचे एमआयडीसी पोलीसांच्या तपासातून निष्पन्न झाले आहे. सच्या टारझन हा कराडातील दिवंगत गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या आश्रयाला काही दिवस होता. त्यामुळे सच्या टारझनच्या खुनामुळे सल्या चेप्याचे नाव पुन्हा एकदा सांगलीत चर्चेले जावू लागले आहे. या घटनेतील संशयित हल्लेखोर गणेश विनोद मोरे (वय- 19, रा.आहिल्यानगर, कुपवाड) याला कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, नामचिन गुंड सचिन पांडुरंग जाधव उर्फ सच्या टारझन हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड होता. त्याच्यावर गुंड दाद्या सावंत याच्या खूनासह हत्या, मारामारी, दहशत पसरवणे, खंडणी यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. सच्या टारझन याची सांगलीसह महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात दहशत होती. सध्या तो एका खूनाच्या गुन्ह्यात जामीनावर आहे. त्याचे अहिल्यानगरमधील एका महिलेशी तीन वर्षापासून अनैतिक संबंध होते. रविवारी मध्यरात्री सच्या त्या महिलेकडे मुक्कामासाठी आला होता. नात्यातील महिलेशी अनैतिक संबंधाचा राग मनात धरून सोमवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास सच्या टारझन झोपेत असल्याची संधी साधून मोरे यांने कोयत्याने डोक्यात सपासप वार केले. या हल्ल्यात त्याच्या उजव्या हाताची बोटेही तुटली. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संशयित हल्लेखोर मोरे हा स्वत:हून पोलिसात हजर झाला.

कराडात सल्या चेप्याच्या आश्रयाला टारझन
सांगलीतील ‘सिव्हिल’ चौकात नगरसेवक दाद्या सावंत यांच्या गोळ्या झाडून खून केल्यानंतर मुख्य संशयित हा सच्या टारझन होता. त्याच्यासह 12 जणांना अटक करण्यात आली. काही दिवसात तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर टारझनला सावंत टोळीकडून धोका असल्याने तो कराडमधील दिवंगत गुंड सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्या आश्रयाला होता. पुढे दाद्या सावंत यांच्या खुनात सल्यालाही अटक झाली. गेल्या पाच वर्षांपूर्वी सल्याचा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर टारझनने कराड सोडून पुणे गाठले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close