kota acadamy karad
कृषीकोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगराज्यसांगलीसाताराहवामान

कोयना धरणातून पुन्हा विसर्ग वाढणार : सातारा जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट

सातारा :- जिल्ह्यातील सहा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण असलेल्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी आज दि. ०१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटावरून ६ फुटापर्यंत उघडून ३२,७७६ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण ३३,८२६ क्युसेक विसर्ग सुरू होईल. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो. धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी.

Koyna Dam
Date: 01/08/2026, 8:00 AM
Water level: 2151’08”
(655.828m)

Gross Storage:
90.03 TMC (85.54%)
Live Storage:
84.91 TMC (84.80%)

Rainfall in mm-
(Daily/Cumulative)
Koyna- 177/3072
Navaja- 205/3714
Mahabaleshwar- NA/3826

Inflow: 59,643 Cusecs.
(5.15 TMC)

Outflow in cusecs
KDPH : 1050
Radial Gate: 22,470
Total Discharge: 23,520

सातारा जिल्ह्यातील सहा धरणातील पाण्याचा विसर्ग पुढीलप्रमाणे (सकाळी 8 वाजता)
1. Koyna 23520 Cusecs
2. Dhom 7847 Cusecs
3. Dhom Balkavadi 4405 Cusecs
4. Kanher 3853 Cusecs
5. Urmodi 3435 Cusecs
6. Tarali 4000 Cusecs

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close