kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

तळबीड पोलिसांची अवैध दारू विक्रीवर कारवाई

श्रीकांत जाधव : उंब्रज प्रतिनिधी
तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे दरम्यान तळबीड पोलिसांनी यशस्वी कारवाई करत १,३६० रुपये किमतीच्या एकूण १७ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. अवैध दारू विक्रीस प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार महिला पोलीस शिपाई सीमा करपे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक कुलदीप कोळी करीत आहेत.सदरची कारवाई तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील, पोलीस हवालदार उत्तम कोळी, पोलीस कॉन्स्टेबल अभय मोरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा करपे यांनी केली.

अवैध दारू विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध तळबीड पोलीस ठाण्याची कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार असून नागरिकांनी अशा कोणत्याही बेकायदेशीर प्रकाराची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन तळबीड पोलिसांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close