Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

शामगाव घाटातील बिबट्याचा ‘तो’ व्हिडिओ खरा की खोटा?

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये गाडीवरील मित्रांचा व्हिडिओ शूट करताना दुचाकीसमोर बिबट्या आडवा आलेला आहे. सदरची घटना शामगाव घाटातील असल्याचे सांगितले जात आहे. सदरील व्हिडिओ खरा आहे की खोटा याबाबत आता अधिकृत वनविभागाने माहिती दिली आहे.

कराड- पुसेसावळी मार्गावर शामगाव घाट आहे. या घाटात मोठ्या प्रमाणावर झाडी असून काल पाऊस कोसळला. त्यामुळे या परिसरातील वातावरणात गारवा जाणवत होता. अशातच सायंकाळच्या सुमारास निसर्गरम्य वातावरणात दुचाकीवरील युवक आपल्या मित्रांचा व्हिडिओ बनवत होते. अशावेळी अचानक दुचाकीच्या समोर एक बिबट्या भरधाव वेगाने आला अन् काही क्षणातच डोंगर परिसरातील झाडीत निघून गेला.

सदरचा व्हिडिओ कराड तालुक्यातील शामगाव घाटातील असल्याचे सांगितले जात आहे. तर दुसरीकडे काही लोकांनी दुसरीकडील असल्याचे सांगत आहेत. अशावेळी कराड वनविभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले यांनी सदरचा व्हिडिओ हा शामगाव घाटातील असल्याचे सांगितले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close