निवडणुका घेतल्या तर सरकारला धक्का बसू शकतो : आ. बाळासाहेब पाटील
अपशिंगे येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

प्रतिनिधी । विशाल वामनराव पाटील
राज्यात सरकार स्थापन होऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असून वाढती महागाई बेरोजगारी अशा असंख्य प्रश्नाकडे दुर्लक्ष करून सरकारमार्फत नवनवीन घोषणा होत असून, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही, एकूणच सरकारकडून जनतेच्या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. सध्याचे सरकार कोणत्या मार्गाने आले आहे, हे सर्व जनतेला माहीत आहे. निवडणुका घेतल्या तर सरकारला धक्का बसू शकतो, या भीतीने निवडणूक घेत नाहीत असा हल्लाबोल आमदार बाळासाहेब पाटील यांनी युती सरकारवर केला. अपशिंगे (ता. कोरेगाव) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षिरसागर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन जयवंतराव घोरपडे, कांतीलाल पाटील, संभाजीराव गायकवाड, जितेंद्र भोसले, अविनाश माने, काकासाहेब गायकवाड, दिलीप कदम, विष्णुपंत कणसे, वसंतराव कणसे, यशवंत पवार, जितेंद्र भोसले, भरत गायकवाड, काकासो जगताप, किरण जाधव, राहुल निकम, जयहनुमान घाडगे, शेखर पाटणे, संजय चव्हाण, विजय गायकवाड, ननावरे सर, प्रशांत घाडगे, विष्णू गायकवाड, तुषार जाधव, सौ.साधना चव्हाण, सरपंच प्रवीण भोसले, उपसरपंच नामदेव मोरे, काकासो भोसले, प्रमोद भोसले, शरद भोसले, पी.जी.भोसले, मधुकर कदम, विलास बुधावले, मोहन भोसले, शिवाजी भोसले, बाळकृष्ण भोसले, सोमनाथ वास्के, जयवंत मोरे, राम माने, चांगदेव भोसले, गणेश केसरकर, रामचंद्र कदम, हिम्मत भोसले, मोहन नलवडे, सयाजी बुधावले, तुकाराम बुधावले, दत्तात्रय भोसले, महेश कदम, शुभम भोसले, सागर भोसले, दादा मोरे, सोमनाथ भोसले, महेश भोसले, विजय भोसले, पुनम भोसले, नंदिनी केसरकर, कमल काकडे, लता भोसले, सविता भोसले, पौर्णिमा भोसले, सुजाता भोसले, रुक्मिणी कदम, वैशाली पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुहास साखरे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विकास चव्हाण तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, शहाजीराव क्षिरसागर कांतीलाल पाटील, जितेंद्र भोसले, सरपंच प्रविण भोसले यांनी मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन जयहनुमान घाडगे यांनी केले. तर आभार रामचंद्र कदम यांनी मानले.
अपशिंगेत आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
स्थानिक विकास निधीतून मारूती मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, जनसुविधा योजनेतून अपशिंगे येथे स्मशानभूमी निवारा शेड बांधणे व सुशोभिकरण करणे, राष्ट्रीय जल पेय योजनेतून अपशिंगे येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे, आमदार स्थानिक विकास निधीतून ग्रामपंचायत मालकीच्या जागेत श्री.खंडोबा मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, डोंगरी विकास निधी योजनेतून अपशिंगे येथे श्री महादेव मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, अर्थसंकल्प मार्च- २०२२ मधून राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा ३३ अ कि.मी.९/५०० ते १२/०० (भाग-एकंबेशिंगे) सुधारणा करणे, लघु पाटबंधारे योजनेतून अपशिंगे ता.कोरेगांव येथील पाझर तलाव नं. २ दुरूस्ती करणे, सर्वसाधारण साकव योजनेतून अपशिंगे येथे म्हसोबा जवळच्या ओढ्यावर साकव पूल बांधणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अपशिंगे ता.कोरेगांव येथे बौध्दवस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, २५१५ इतर ग्रामीण विकास योजनेतून अपशिंगे ता.कोरेगांव येथे अपशिंगे ते नवलेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, जलजिवन योजनेतून अपशिंगे येथे विहीर दुरूस्ती करणे, नवलेवाडी वसाहतीमधील विहीरीचे खोलीकरण व आर.सी.सी. बांधकाम करणे. यामधील पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन व नव्याने मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.