क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

पाटण तालुक्यात दीड वर्षापासून विवाहितेवर अत्याचार : दोन सख्या भावंडावर उंब्रजला गुन्हा दाखल

उंब्रज | तारळे (ता. पाटण) परिसरातील एका 23 वर्षीय विवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून व्हायरल करण्याची तसेच नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार व विनयभंग केल्याचा तक्रार पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. दीड वर्षापासून दोन सख्या भावांनी वेळोवेळी अत्याच्यार आणि विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या तक्रारीत विशाल ऊर्फ बाळा तुषार पाटील (रा. तारळे, ता. पाटण) व अभिजित ऊर्फ पप्पू तुषार पाटील अशी भावंडांची नावे असून, विशाल याच्यावर अत्याचाराचा तर अभिजित याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांचेही परिसरात राजकीय वर्चस्व आहे. या दोघा भावांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पीडित विवाहित महिलेने उंब्रज पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, विशाल ऊर्फ बाळा पाटील याने पीडित महिलेला काढलेले अश्लील फोटो दाखवून गेल्या दीड वर्षापासून तिच्यावर वारंवार अत्याचार केले. याबाबत कोणाला सांगितल्यास नवऱ्यास जिवे मारण्याची धमकीही त्याने वेळोवेळी दिली. तर अभिजित ऊर्फ पप्पू पाटील याने पीडित महिलेचा विनयभंग केला. यादरम्यान, पीडित महिलेने दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तसेच संस्थेचे तारे परिसरात राजकीय वर्चस्व असल्याची फिर्यादीत म्हटले आहे

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close