ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

डाॅ. अमोल कोल्हेंना पाठीचा त्रास : शिवपुत्र संभाजी महानाट्याचे शो रद्द

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथे 28 एप्रिल ते 3 मे या दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग आयोजित करण्यात आले होते. परंतु दि. 2 व 3 मे रोजीचे प्रयोग रद्द केल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली. पाठीचा त्रास होवू लागल्याने शेवटचे दोन प्रयोग रद्द करण्यात आले असून उद्या दि. 1 मे रोजी शेवटचा प्रयोग होणार आहे.

शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग सुरू असताना घोडेस्वारी दरम्यान डॉ. अमोल कोल्हे यांना पाठीचा त्रास होऊ लागल्याने पुढील दोन शो रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा दिनांक 2 व 3 तारखेचे तिकिट काढले असेल त्यांची 1 तारखेच्या शोसाठी तिकिटे ग्राह्य धरली जाणार आहेत. ज्यांना या कार्यक्रमासाठी येणे शक्य नसेल, त्यांना तिकीटाचे पैसे परत देणार असल्याचे डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगीतले.

कराड येथे 28 एप्रिल राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत या महानाट्याचा शुभारंभ करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसात कराडकरांनी या महानाट्याला भरभरून प्रतिसाद दिला होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close