Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद गुजले यांचे निधन

कराड | कार्वे गावचे सुपुत्र,दै.सांजवातचे कराड तालुका प्रतिनिधी,ज्येष्ठ पत्रकार प्रल्हाद आण्णा गुजले यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

प्रल्हाद गुजले हे सुमारे तीन दशके वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत होते. सह्याद्री एक्सप्रेसपासून त्यांनी आपल्या कार्यास सुरुवात केली. सह्याद्री एक्सप्रेसनंतर त्यांनी दै.कृष्णा एक्सप्रेस,दै. प्रीतीसंगम, दै. कर्मयोगी या वृत्तपत्रासाठी त्यांनी काम केले होते. सध्या ते दैनिक सांजवाचे कराड तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आकस्मित निधनाने कराडच्या पत्रकार संघात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

प्रल्हाद गुजले निधनाचे वृत्त समजताच सामाजिक, राजकीय तसेच वृत्तपत्र क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्यावर कार्वे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सून व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांचा रक्षाविसर्जन विधी शुक्रवार दि.15 सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता कार्वे येथे होणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close