क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

साताऱ्यातील बाळूपाटलाचीवाडीत रात्रीत सव्वादोन लाखांची घरफोडी

लोणंद | बाळूपाटलाचीवाडी (ता. खंडाळा) येथे घराचे कुलूप तोडून दीड लाखांची रोकड व सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 23 हजार रुपये किमतीचा ऐवज रात्री दहा ते आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेला आहे.

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, बाळूपाटलाचीवाडी (ता. खंडाळा) येथील शेतकरी कुंडलिक यशवंत धायगुडे यांच्या घराचे कुल्लूप काल रात्री दहा ते आज पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी सोडून घरात प्रवेश करून घरातील एक लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच जुन्या किमतीनुसार 13 ग्रॅम वजनाचे 38 हजार रुपये किमतीचे गळ्यातील सोन्याचे गंठण, पाच ग्रॅम वजनाची 15 हजार रुपये किमतीची बोरमाळ, पाच ग्रॅम वजनाचे 15 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे दोन टॉप्स, दोन ग्रॅम वजनाचे पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी असा एकूण 2 लाख 23 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.

लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वानपथक व उसे तज्ज्ञांना पाचारण करून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, चोरटे व चोरट्यांचा माग पोलिसांना लागला नाही. याबाबत कुंडलिक यशवंत धायगुडे (रा. बाळूपाटलाचीवाडी, ता. खंडाळा) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, सहायक पोलिस निरीक्षक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम अधिक तपास करत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close