ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारासामाजिक

पाटणला धडकलं सकल धनगर समाजाचं ”पिवळे वादळं”

पाटण प्रतिनिधी | संजय कांबळे
“यळकोट यळकोट जय मल्हार”चा जयघोष करत एस.टी. प्रवर्गातून आरक्षण व इतर मागण्यांसाठी आज पाटण तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पाटण तहसीलदार कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे निमित्ताने पाटणमध्ये पिवळा जनसागर उसळला. रविवारी सकाळी तालुक्यातील डोंगर कपारीत राहणारा धनगर समाज मोठ्या संख्येने चाफोली रोड (डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर कमानी) येथे एकत्र जमले. राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोर्चास सुरवात झाली.

“यळकोट यळकोट जय मल्हार”, “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”,”कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही, एस .टी. आरक्षण अंमलबजावणी झालीच पाहिजे, धनगडाचा धनगर झालाच पाहिजे, अशा गगनभेदी घोषणा व महापुरुषांचा जयजयकार करीत सोबत पारंपरिक धनगरी पोशाखात डोक्यावर पिवळी टोपी, गळ्यात पिवळा मफलर, हातात पिवळा झेंडा व मागण्यांचे फलक घेतलेल्या समाज बांधव-भगिनी, अबाल वृद्ध हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपारिक गजी नृत्य, ढोल ताशा, लेझीम खेळत हा महामोर्चा कराड -चिपळुण मार्गावरून नवीन स्टॅंड- झेंडाचौक-मुख्य बाजारपेठ -लायब्ररी चौक मार्गे थेट तहसिल कार्यालयावर धडकला,

मोर्चाचे सांगता सभेत रुपांतर
यावळी सुरवातीस महापुरुषांच्या प्रतिमेस ज्येष्ठांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून सभेस सुरवात झाली. यावेळी अनेक समाजबांधवांनी आपल्या मनोगतातून धनगर आरक्षणासह इतर मागण्यांचा पाढा वाचला. एस.टी आरक्ष णासाठी महाराष्ट्र पेटून उठलाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला घटनेत आरक्षण दिले आहे, मात्र, आजवरच्या 70 वर्षातील राज्य करतत्र्यंनी आपल्याला हक्काच्या आरक्षणापासुन वंचित ठेवण्याचे महापाप केले आहे. याला जबाबदार धनगर समाजच आहे, डोंगर कपारीत राहणारा शेळ्या- मेंढ्या राखुन जगणारा आमचा धनगर समाज हक्काच्या आरक्षणापासुन वंचित आहे. समाज अनेक पक्षात विखुरला आहे. एकजुट नाही, धनगरांनी पिवळ्या झेंड्याखाली एकत्र या आरक्षण नक्की मिळेल. सहा महिने कोणत्याही नेत्याच्या दारात जाऊ नका, पदांचा राजीनामा द्या, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा मूलमंत्र दिला आहे. समाजातील मुलांनी शिकले पाहिजे. बाबासाहेबांनी संघर्ष करायला शिकविले आहे. धनगर समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. इतर 7 राज्यात धनगरांना एस.टी. प्रवर्गातून आरक्षण दिले आहे. आपल्या हक्काच आरक्षण मिळविण्यासाठी हा लढा महाराष्ट्रभर पुढे लढायचा आहे, या लढ्यात पाटण तालुका सिंहाचा वाटा उचलेल. अशा भावना यावेळी अनेक धनगर बांधव-भगिनिंनी व्यक्त केल्या. यानंतर तहसिलदार रमेश पाटील यांनी मागण्यांचे निवेदन स्विकारले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker