kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासामाजिक

MSEB च्या कांबळेची मगरूरीची भाषा : होय, आमची पठाणी वसुली आहे

मार्च एण्डच्या नावाखाली मनमानी पद्धतीने वीज तोडणी सुरु

कराड । होय आमची पठाणी वसुली आहे. मार्च महिना असल्याने कोणतीही पूर्व सूचना व ग्राहकाला सहकार्य न करता आम्ही मनमानी पद्धतीनेच वीज कनेक्शन तोडणार. ग्राहकाला सहकार्य करण्याचे आमचे काम नाही, अशा पद्धतीची मगरूरीची भाषा विजयनगर येथील MSEB ऑफिस मधील कनिष्ठ अभियंता कांबळे यांची आहे.

सध्या मार्च महिना अखेर चालू असल्यामुळे एक बिल जरी थकीत असेल आणि तुम्हाला सध्याचे बिल मिळाले नसेल. तसेच ग्राहकाला कोणतीही कल्पना नसली तरीही वीज कनेक्शन आम्ही तोडणार. यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही. आमची मनमानी अशी चालू राहील त्यासाठी कर्मचाऱ्यानी तुम्हाला सूचना दिली असेल किंवा नसेल याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही. केवळ आम्हाला वीज कनेक्शन तोडायचे एवढेच माहित आहे. याकरता तुम्हाला बिल हातात मिळाले का नाही, याचे आम्हाला कोणतीही देणे- घेणे नाही.

ग्राहकाने वीज भरण्याची जबाबदारी आहे. तसेच त्यांना बिले मिळाली का नाही हे पाणी आमचं काम नाही. आम्ही वीज कलेक्शन तोडताना त्या ग्राहकाला बिल मिळाले आहे का किंवा नाही. ग्राहकाने पैसे भरले आहेत का? नाही या गोष्टीची शहानिशा करायला रिकामे नाही. त्यामुळे थकीत बिल दिसल्यास आम्ही वीज कनेक्शन तोडणारच अशी उर्मट भाषा कनिष्ठ अभियंता कांबळे यांची ग्राहकांशी होऊ लागली आहे.

बिलावर २२ तारखेपर्यंत बिल भरण्याचा शिक्का, कारवाई त्या अगोदर
ग्राहकांना वीज बिल मिळाले नाही. वीज बिलावर २२ तारखेपर्यंत बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा शिक्का आहे. मात्र, आज १७ तारखेलाच वीज कनेक्शन तोडणी सुरु केली आहे. याबाबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता. आम्ही केवळ कारवाई करणार आहोत. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी बांधील नाही. अशा पद्धतीची भाषा सुरु केली आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close