Crime News : नटराज टाॅकिज येथून देशी पिस्टलसह दोघांना अटक


कराड | शहरातील नटराज टाॅकीज येथे देशी बनावटीचे पिस्टल विक्री करणाऱ्या दोघांना कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने आज गुरूवारी (दि. 7) अटक केली. अनिकेत पालकर व त्याचा साथीदार दिवाकर बापुराव गाडे (वय- 28 वर्षे, रा. बैल बाजार रोड मलकापुर- कराड) अशी संशयितांची नावे आहेत. संशियांकडून एक पिस्टलसह एकुण 1 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस उपनिरिक्षक आर. एल. डांगे व पथकाने जुलै महिन्यात एम. के. ऊर्फ मनोज खांडेकर या सराईत गुंडास पिस्टलसह छापा टाकुण अटक केली होती. पिस्टल धारी गुंडाना रडारवर घेत असतानाच आज (दि. 7) गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिकेत पालकर यांचेकडे देशी बनावटीचे पिस्टल असुन तो सध्या नटराज टॉकीज समोर एका काळ्या रंगाचे एक्सेस गाडीवर उभा आहे. तेव्हा डीबी पथक अधिकारी राजू डांगे यांनी पथक तयार करुन नटराज टॉकीज जवळून अनिकेत पालकर व त्याचा साथीदार दिवाकर गाडे यास ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून 1 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बागंर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक डांगे, सफौ रघुवीर देसाई, सफौ संजय देवकुळे, पोलीस हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, रईस सय्यद, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली.




