ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराड तालुक्यातील ‘या’ गावात बोलेरो गाडीच्या आडवा बिबट्या व बछडा

कराड | शिवडे – भवनवाडी (ता. कराड) येथील डोंगर परिसरात बिबट्याचा वावर असून गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हनुमानगावचे गावचे युवा शेतकरी संकेत जाधव यांना शेतातून घरी परतत असताना दोन बिबटे व एका बछड्याचे दर्शन झाले. त्यांनी मोबाईल कॅमेराने बिबट्याचे फोटो टिपले आहेत. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली असून शिवडे, भवानवाडी, वराडे येथील डोंगर परिसरात बिबट्याचा वास्तव्य असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शिवडे (ता. कराड) गावचे हद्दीत हनुमानगाव येथील युवा शेतकरी संकेत जाधव यांचा टोमॅटोचा प्लॉट आहे. ते रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बुलेरो चार चाकीतून घरी परतत असताना खरजूली देवीच्या डोंगर पायथ्याला असणाऱ्या रस्त्यावर त्यांना दोन मोठे बिबटे व एक बछडा रस्त्यावरून चालत असताना दिसून आला. त्यांनी सदरच्या बिबट्याचे फोटो मोबाईल कॅमेरातून काढले आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून वराडे, शिवडे, भवानवाडी या परिसरात बिबट्यांच्या प्रजातीचे मोठे वास्तव्य आहे. येथील शेतकऱ्यांना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरू लागले आहेत. अनेकदा मात्र नाईलाजाने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पाणी पाजण्यासाठी शेतात जावे लागते. परंतु अधून मधून बिबट्याचे दर्शन होत असल्याने घबराटीचे वातावरण आहे. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker