kota acadamy karad
कृषीकोकणकोल्हापूरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगरत्नागिरीराज्यसातारासिंधुदुर्गहवामान

कोकणाला पावसाचा ऑरेंज अलर्ट : पुणे, सातारा व कोल्हापूरला यलो अलर्ट

मुंबई | मॉन्सून परतीचा प्रवास सुरू असतानाच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार वादळी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. 28) दक्षिण कोकणात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. मध्य महाराष्ट्रात, कोकणात काही ठिकाणी जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. आज अनंत चतुर्थीला पावसाची हजेरी लागणार असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीणा ब्रेक लागू शकतो.

उद्या शुक्रवार (ता. 29) पर्यंत उत्तर अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. शनिवार (ता. 30) पर्यंत या भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, या प्रणालीपासून उत्तर कर्नाटक किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तसेच उत्तर अंतर्गत कर्नाटकमध्ये, तसेच तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. 28) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. तर कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. विदर्भासह, उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close