kota acadamy karad
उत्तर महाराष्ट्रकोकणताज्या बातम्यानोकरी संदर्भपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामुंबईराजकियराज्यविदर्भशैक्षणिकसातारा

तलाठी भरती : राज्यात 4 हजार 644 पदासांठी जाहिरात निघाली

हॅलो न्यूज । महसूल विभागात राज्य सरकारने घोषित केलेल्या 75 हजार मेगा भरतीमधील तब्बल 4 हजार 644 तलाठी पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तलाठी पदभरती मोठ्या संख्येत होत असल्याने स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले आहे.

Kota Academy Karad

विविध जिल्ह्यांतील तलाठींची एकूण 4,644 रिक्त पदे भरली जाणार आहेत. महाराष्ट्र शासनाकडून या भरतीसाठी 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी आणि पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेले उमेदवार तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकतात.

Brilliant Academy

भूमी अभिलेख विभागाकडून तलाठी भरती परीक्षा घेण्यात येणार असून लवकरच परीक्षेची लिंक खुली करण्यात येणार आहे. ही परीक्षा ‘टीसीएस’ कंपनीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. दरम्यान, या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज भरल्यास ते बाद करण्यात येतील, याची नोंद घेण्याचे आवाहन महसूल विभागाने केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close