कराड उत्तरला नूतन जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपाची टिफिन बैठक

मसूर प्रतिनिधी। गजानन गिरी
कराड उत्तर मतदार संघात साडेसात कोटीचा निधी विकास कामासाठी उपलब्ध झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यामुळे आणखी निधी उपलब्ध होणार असून कराड उत्तरला यापुढे विकासाच दिसणार असल्याची माहिती भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली. चौफेर विकासासाठी आगामी निवडणुकीत कराड उत्तरमध्ये भाजपचाच आमदार असणार असल्याचा विश्वासही बेलवाडी ता कराड येथे जय हनुमान अकॅडमीत भाजपतर्फे मोदी @ 9 व महाजनसंपर्क अभियानांतर्गत बुद्धिजीवी संमेलनप्रसंगी बोलताना व्यक्त केला. टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमास कराड उत्तर युवा नेते रामकृष्ण वेताळ, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड, जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डूबल, भाजपच्या जिल्हा सचिव दिपाली खोत, भीमराव पाटील, सुरेश पाटील, महिला मोर्चा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव, तालुकाध्यक्ष महेश जाधव, शंकरराव शेजवळ, शहाजी मोहिते, सुनील दळवी, जयवंत जगदाळे, नम्रता किरकिरे, नवीन जगदाळे, दिनकर पाटील, अतुल जगदाळे, राजेंद्र लोहार, बापू चौधरी, अनिल माने, युवराज चव्हाण यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी बूथ अध्यक्षांनी गावातील समस्या मांडल्या.
रामकृष्ण वेताळ म्हणाले कराड उत्तरमध्ये भाजपाची ताकद वाढली आहे. विकासाच्या विविध योजना प्रत्यक्षात साकारत आहेत. विशेषता राज्यातील बारा कोटी जनतेला आरोग्य विमा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झाले आहे. आणखी भरीव विकास कामांसाठी कराड उत्तरमध्ये भाजपचा आमदार पाहिजे. भाजपच्या माध्यमातून आता विकास कामे दिसणार आहेत. नऊ वर्षाच्या कालावधीतील कामे लोकांच्यापर्यंत पोहोचवा असेही आवाहन केले. दिपाली खोत यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून अनेक लाभार्थी वंचित असून गावागावामधे जाऊन लोकांची समस्या सोडविल्या पाहिजे असे सांगितले, यावेळी अंत्योदय हेच ब्रीदवाक्य, सशक्त शेतकरी समृद्ध भारत, भारतातील अमृत पिढी सक्षमता, नारी तू नारायणी, महिला सक्षमीकरण, राज्यांचा विकास, सांस्कृतिक वारसाचे युग आदि विषयावर विचारमंथन झाले.