Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराज्यसातारा

कोळे येथील सैन्य दलातील जवान दत्तात्रय देसाई अमर : आज दुपारी अंत्यसंस्कार

कराड | कोळे (ता. कराड) येथील भारतीय सैन्य दलात असलेले जवान दत्तात्रय रामचंद्र देसाई (वय- 52) यांचे निधन झाले. आज गुरुवारी दुपारनंतर त्यांच्यावरती शासकीयत इमामात कोळे येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोळे येथील दत्तात्रय देसाई यांनी छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, मुंबई, पुणे येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावली आहे. वयाच्या 22 व्या वर्षी ते सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांनी भारतीय सैन्य दलात 30 वर्षे सेवा बजावली.

सध्या ते CRPF मध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. मुंबई येथे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे. कोळे ग्रामस्थांच्या व श्री घाडगेनाथ आजी-माजी सैनिक मंचतर्फे अमर जवान दत्तात्रय देसाई यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close