क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

साताऱ्यातील व्यावसायिकाची 20 लाखाची फसवणूक

सातारा | साताऱ्यातील एका व्यापाऱ्याची 20 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. हरियाणातील एकाने पामतेलाचे 2200 डबे देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची तब्बल 20 लाख 72 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी भरत अरोरा याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सदरची घटना दि. 1 ते 12 मार्च दरम्यान घडली आहे.

Shree Furniture Karad- Patan

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिवानंद वसंत बारवडे (वय- 36, रा. शनिवार पेठ, सातारा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भरत अरोरा हा हरियाणा राज्यातील अंबाला येथील प्रिशा जे. एम. डी या कंपनीचा अधिकारी आहे. या कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या सुहास मधुकर नवरकर यांनी शिवानंद यांची ओळख अरोरा यांच्याशी करून दिली होती. नवरकर यांनी प्रिशा कंपनीचे सूर्यकांती पामतेल विकावे, असे सांगून शिवानंद यांना विश्वास संपादन केला.

सुरूवातीला या दोघांमध्ये 1100 तेल डबे खरेदीचा व्यवहार झाला. यानंतर दुसऱ्यांदा शिवानंद यांना 2200 तेल डब्यांचे पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार शिवानंद यांनी कंपनीच्या नावे 20 लाख 72 हजार 400 रूपये भरले. पैसे भरल्यानंतर तेलाच्या डब्याची डिलिव्हरी होणे अपेक्षित होते. मात्र, शिवानंद यांना तेलाचे डबेच मिळाले नाहीत. याबाबत त्यांनी नवरकर व अरोरा यांच्याशी संपर्क साधल्यानंतरही तेलाचे डबे मिळाले नाही. त्यामुळे शिवानंद यांनी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close