kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यशैक्षणिकसातारा

पाटण तालुक्यात कृषी महाविद्यालय उभारणार..! : मंत्री शंभूराज देसाई

कोयना शिक्षण संस्थेतून देसाई परिवाराला कारस्थान करून बाजूला केले

कराड । विशाल वामनराव पाटील
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या प्रगती साठी पाटण तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्या प्रगतीसाठी स्वर्गीय आबासाहेब यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांनी घालून दिलेल्या आदर्श विचारांच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आपण सदैव प्रयतशील आहे. दरम्यान, पाटण तालुक्यातील शैक्षणिक विकासासाठी लोकनेते बाळासाहेब देसाई आणि स्व. शिवाजीराव देसाई यांनी आपले आयुष्य वेचले. मात्र, तालुक्यातील काही लोकांनी कारस्थान करून कोयना शिक्षण संस्थेतुन देसाई परिवाराला जाणीवपूर्वक बाजूला केले. मात्र तरीही तालुक्यात विविध प्रकारची शिक्षणाची दालने उभी करून देसाई परिवाराने सर्वांगीण शैक्षणिक विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता तालुक्यात लवकरच अग्रीकल्चर महाविद्यालय उभारणार असल्याची ग्वाही राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.

लोकनेते बाळासाहेब सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव देसाई यांच्या 37 वा पुण्यतिथी कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, देसाई कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, जयराज देसाई, आदित्यराज देसाई, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, डॉ दिलीपराव चव्हाण, पाटण बाजार समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील, विलास गोडाबे, अशोकराव पाटील, बशीर खोंदू, ॲङ डी.पी.जाधव, विजय पवार, विजय शिंदे, संतोष गिरी, पंजाबराव देसाई, सुरेश पानस्कर, भरत साळूंखे, शिवदौलत बँकेचे चेअरमन संजय देशमुख, अभिजित पाटील, बबनराव शिंदे, माणिक पवार, राजेंद्र चव्हाण, नामदेवराव साळूंखे, जालिंदर पाटील, सोमनाथ खामकर, बबनराव भिसे, शशिकांत निकम, विजय जंबुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले, आपल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी अग्रिकलक्चर सारखे महाविद्यालय निर्माण व्हावे, अशी ग्रामीण भागातून मागणी असलेने लवकरच आपण पाटण मतदार संघात अग्रिकलक्चर महाविद्यालय उभारणीसाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा करून लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा एक काळ सुवर्णकाळ होता आणि लोकनेत्यांच्या तोच दरारा आणि सुवर्णकाळ पुन्हा निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. तसेच पाटण मतदारसंघ हा विकासकामांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात एक रोल मॉडेल होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. दरम्यान मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पाटण तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक केंद्रात प्रथम, व्दितीय, तृतीय व विविध स्पर्धा त उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक पांडुरंग नलावडे यांनी केले. आभार बबनराव शिंदे यांनी मानले.

कोयना शिक्षण संस्थेत कारस्थान केले..!
लोकनेते बाळासाहेब देसाई, के. व्ही. बापू पाटील, भागवतराव देसाई यांनी कोयना शिक्षण संस्था उभारली आणि काही लोकांनी त्यांना या संस्थेतून बाहेर काढले. काही लोकांनी स्वतः च्या ताब्यात कोयना शिक्षण संस्था घेतली. राजकारण करुन संस्था ताब्यात घेतली. म्हणून मोरणा शिक्षण संस्था काढली. राजकारण कटकारस्थान करुन कोयना संस्था ताब्यात घेतली. म्हणून आम्ही जिद्दीने मोरणा संस्था काढून तालुक्यात शिक्षणाची दारे उघडून दिली.असा टोला मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी लगावला

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close