ईतरताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

मी बैल आहे, बेडकानं काॅपी करू नये : अभिजीत बिचुकले

सातारा | बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकलेंनी (Abhijit Bichukale) मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सिलेंडरच्या किमती 50 टक्के कमी करण्याची मागणी केली आहे. याबाबत माध्यमांशी ते बोलत होते. पुढे म्हणाले, मी बैल आहे, माझी काॅपी कोणी करु नये बेडकानं बैल व्हायचं पाहु नये असा खोचक टोला देखील बिचुकलेंनी विरोधकांना लागावला आहे.

अभिजीत बिचुकले म्हणाले, महिला वर्गाला एसटी बसच्या प्रवासासाठी 50 टक्के सवलत दिली. त्याबाबत सरकारचं अभिनंदन करतो, मात्र महिला वर्गाची खरी गरज असणा-या सिलेंडरला 1200 रुपये द्यावे लागतात. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. सरकारने ताबडतोप सिलेंडरवर 50 टक्के सबसिडी द्यावी, अशी सुचना पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिली असल्याचं अभिजीत बिचुकले यांनी सांगितलंय.

तर पुढील मुख्यमंत्री ही महिला असेल ही भुमिका मी मांडली होती. मात्र, आता माझी काॅपी इतर लोकं करायला लागले आहेत. मी बैल आहे, माझी काॅपी कोणी करु नये. बेडकानं बैल व्हायचं पाहु नये, असा खोचक टोला देखील बिचुकलेंनी लागावलाय.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker