क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रपुणेराज्यसातारा

एसटी- दुचाकीच्या धडकेत एकाच गावातील 3 युवक जागीच ठार

लोणंद | सातारा व पुणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या लोणंद- निरा रोडवर रेल्वे उड्डाण पुलावर एसटी व मोटारसायकलच्या धडकेत मोटारसायकल वरील तीन युवक जागीच ठार झाले. अपघातात ठार झालेले तीनही युवक एकाच गावातील असल्याने पिपंरे खुर्द गावावर शोककळा पसरली. मंगळवेढाहून पुण्याकडे निघालेली एसटी बस क्रमांक (MH- 20 BL- 4158) व निरेकडून लोणंदला निघालेली मोटरसायकल क्रमांक (MH- 12 RV- 3158) यांच्यात जोरदार धडक झाली.

Shree Furniture Karad- Patan

या अपघातात ओकांर संजय थोपटे, पोपट अर्जुन थोपटे आणि अनिल नामदेव थोपटे (सर्व रा. पिपंरे खुर्द ता. पुरंदर) हे तीनही तरुण जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर पीएसआय गणेश माने व त्यांचे सहकार्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळावर अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. तसेच अपघाताचे प्रसंग मन हेलावून टाकणारा होता. या ठिकाणची वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. या गुन्ह्याची नोंद रात्री उशिरा लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात येत होती.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close