Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कोरोना रूग्ण वाढले : जिल्ह्याचा पाॅझिटीव्ह रेट 13.22 टक्के

सातारा | कोरोना रूग्ण संख्येत सातारा जिल्ह्यात झपाट्याने वाढ होवू लागली आहे. काल आलेल्या रिपोर्टमध्ये 32 तर आज 30 रूग्ण पाॅझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे सध्या कोरोनाचे 93 रूग्ण जिल्ह्यात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

सातारा जिल्ह्यात गत आठवड्यात 22, 32 आणि आता 30 असे कोरोना रूग्ण आढळून आले होते. तर 2 रूग्णांचा मृत्यू झाला होता. तसेच दिवसेंन दिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या पाॅझिटीव्ह रेट हा 13.22 टक्के इतका आहे.

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासात 227 रूग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 30 रूग्ण बाधित आढळून आलेत. जिल्ह्यातील विविध रूग्णालयात केवळ 13 रूग्ण उपचार घेत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close