Hello News 2026 Ganpati Arati Book
खेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कुस्ती दंगल : सुर्लीत उद्या सिकंदर शेख आणि इराणचा अली भिडणार

कराड | कराड तालुक्यातील सुर्ली येथे ऊरसानिमित्त मंगळवार (दि. 11 एप्रिल रोजी) भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मैदानात भारत केसरी सिकंदर शेख आणि इराणचा तगडा मल्ल अली इराण परस्परांशी भिडणार आहेत, अशी माहिती हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी दिली.

सुर्ली येथे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील जंगी कुस्त्यांचे मैदाने आयोजित केले आहे. यामध्ये पंजाबचा कमलजीत विरुध्द सुपने (ता. कराड) येथील दिग्विजय जाधव यांच्यात मुकाबला रंगणार आहे. तसेच सुशांत माने विरुद्ध मंगेश बैले, रणजित राजमाने विरुध्द इंद्रजित मुळे, वैभव येवले विरुध्द आकाश वेताळ, गौरव हजारे विरुद्ध अनिकेत पाटील, भारत पवार विरुध्द मोईन पटेल, एजाज पटेल विरुध्द प्रवीण पवार, विक्रम वेताळ विरुध्द सुमित पाटील, आर्यन भोगे विरुध्द प्रसाद पांढरे, तजेस ढमाले विरुध्द अनिल जाधव, निखील पाटील विरुध्द वेदांत पाटील, स्वप्निल मदने विरुध्द अमर रणदिवे, विक्रम माने विरुद्ध करण जाधव यांच्यात अटीतटीच्या मुकाबला होणार आहे.

याशिवाय मैदानात छोट्या-मोठ्या अनेक कुस्त्या होणार आहेत तरी कुस्ती शौकिन आणि मल्लांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान नवनाथ पाटील व कुस्ती कमिटीने केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close