Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

शूट ॲट साईट : छ. उदयनराजे आक्रमक

कराड 😐 सातारा जिल्ह्यात पिस्टल मोठ्या प्रमाणात सापडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर छ. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अल्पवयीन गुन्हेगारांच्या संख्येत वाढ झाली असून एखाद्याला खल्लास करण्यासाठी डोक चालत असेल तर त्याला शूट ॲट साईट (Shoot at site) करून टाकायचं, पुढे मागे बघायचं नाही, असे म्हटले आहे.

कराड येथील अमित एक्झिक्युटीव्ह हाॅटेल (Amit Executive Hotel- karad) येथे छ. उदयनराजे भोसले माध्यमांशी बोलत होते. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, सुनिल काटकर, माजी महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, पाटणचे युवानेते सत्यजितसिंह पाटणकर, विजयनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच मानसिंग पाटील, माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, हणमंतराव पवार आदी उपस्थित होते.

छ. उदयनराजे भोसले म्हणाले, कायद्यात भरपूर पायवाटा आहेत. अल्पवयीन 18 वर्षाखालील गुन्हेगारांच्यात वाढ होत आहे. त्यांना रिमांड होममध्ये नेलं जात. माझं म्हणणं तर आहे, ज्याला एखाद्याला खल्लास करण्यासाठी डोकं असेल तर त्याला शूट ॲट साईट करून टाकायचं, जोपर्यंत तुम्ही उदाहरण देत नाही, तोपर्यंत गुन्हेगारांच्यात वाढ होत राहणार. वकिल मंडळी घेणार, ज्याच्यावर अत्याचार झाला त्यानाच पोलीस स्टेशनला आत टाकलं जातयं. त्याच्यावरच केसेंस टाकल्या जातात.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close