kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Video : वराडे येथे लक्ष्मी मंदिर परिसरात भीषण आग

कराड | वराडे (ता. कराड) येथील लक्ष्मी मंदिर परिसरात असणाऱ्या झाडांना अचानक आग लागल्याने वनसंपदा जळून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी रात्री अचानक हे आग लागली शुक्रवारी पहाटे पर्यंत आग सुरू होती. परिसरात असणाऱ्या पालापाचोळ्याने व वाऱ्याच्या वेगाने आग भडकली. त्यामध्ये अनेक नैसर्गिक वनसंपदा जळून खाक झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, वराडे येथील लक्ष्मी मंदिर परिसरात घनदाट झाडी आहे. मंदीरा समोर असणाऱ्या ओढ्यावर घनदाट झाडी, झाडेझुडपे आहेत. येथे गुरुवारी 14 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. वाऱ्याच्या वेगाने आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडे जळून खाक झाले आहेत.

शुक्रवारी पहाटेपर्यंत ही आग सुरू होती.‌ दरम्यान उन्हाळ्याच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने झाडांना मोठी झळ बसली आहे. आग लागण्यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close