MLA Atul bhosale karad.jpeg Ganesh Advt
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कॅफेत अश्लील चाळे : दोन अल्पवयीन मुलींसह चाैघांना घेतले ताब्यात

सातारा | शहर परिसरातील हिडन कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून दोन अल्पवयीन मुलींसह चाैघांना ताब्यात घेतले. सातारा शहर पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश केदारी कागिलकर (वय- 21, रा. नागेवाडी, ता. सातारा), शुभम विष्णू शिंदे (वय- 24, रा. किन्हई, ता. कोरेगाव), विक्रम नंदकिशोर निकम (वय- 22, शिवाजी चौक, पुसेगाव, ता. खटाव), आशुतोष हिंदुराव माने (रा. जुनी एमआयडीसी धनगरवाडी, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एमआयडीसीतील हिडन कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तेथे छापा टाकला. त्यावेळी दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे करताना दोन तरुण सापडले.

पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यांची चाैकशी केल्यानंतर त्यांच्या पालकांनाही याची माहिती देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कॅफे मालक आशुतोष माने, चालक विक्रम निकमसह दोन तरुणांवर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे या अधिक तपास करीत आहेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close