Hello News 2026 Ganpati Arati Book
कृषीक्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसांगलीसातारा

गवारेड्याचा शेतकऱ्यावर हल्ला : गंभीर जखमीवर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू

शिराळा | मणदुर (ता. शिराळा) येथे वारणा डावा कालव्याच्या बाजुस असणार्‍या काळांमा देवीच्या मंदीर परीसरात शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास सदर गव्याने अशोक विष्णु सोनार (वय- 62) या शेतकर्‍यावर गंभीर हल्ला करुन जखमी केल्याची घटना घडली. सदरील माहीती मणदुर गावात समजताच यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

आज सकाळी गव्याने हल्ला करुन जखमी सोनार यांना कालव्याच्या बाजुला असणार्‍या रस्त्यावर फेकुन दिले. शेजारीच शेतात काम करत असलेल्या शेतकर्‍यांनी आरडाओरडा केल्याने गवा डोंगराच्या दिशेने पळुन गेला. दरम्यान, वनविभागाचे वनपाल गार्दी यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत याची माहीती वरीष्ठांना दिली जखमीवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डाॅक्टरांनी उपचार करुन पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

एस. एच. पाटील इस्लामपूर

सदर गव्यांचा कळप वारणावती वसाहती जवळ असणार्‍या पाणी पुरवठा टाकी जवळ रात्री हे गवे नागरीकांना दिसले होते. दिवसा उन्हाची तिव्रता वाढत असल्याने सध्या शेतकरी वर्ग सकाळी लवकर खरीप हंगामतील मशागतीची कामे आपल्या शेतात करण्यास लवकर जात आहेत असे जर हल्ले सातत्याने घडु लागले तर शेतकर्‍यांनी शेतात काम करण्यास जायाचे कस असा सवाल मणदुर ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान, गव्याने जखमी केल्याची माहिती मिळताच माजी सरपंच वसंत पाटील,सावळाराम पाटील, राम माने, हणमंत पाटील,बंडा पाटील,कृष्णकांत बेलवेलकर,गौरव सोनार,या नागरिकांनी घटना स्थळी धाव घेत जखमीस तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवले. या घटनेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी शेतात वावरताना काळजी घेण्याची गरज दिसुन येत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close