Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारासामाजिक

विद्यार्थ्यांनो! शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 30 मे पर्यंत मुदतवाढ

पुणे | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन 2022-23 मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेस 30 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरता येणार आहे. असे आवाहन समाज कल्याण आयुक्त, डॉ प्रशांत नारनवरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

राज्यातील सर्व शासनमान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालये प्राचार्य व या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती (SC), विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सन 2022-23 यावर्षासाठी प्रलंबित असलेले मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी- परीक्षा फी, व्यावसायिक पाठयक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इ.नवीन व नुतनीकरण (Renewal) चे अर्ज भरता येणार आहेत.

प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज निकाली काढणेकरीता यापूर्वी 30 एप्रिल 2023 ही अंतिम दिनांक देण्यात आलेली होती. परंतु प्रतिवर्षीची नोंदणीकृत अर्ज संख्या लक्षात घेता. या वर्षीची अर्ज संख्या तुलनेत कमी असून विद्यार्थ्याचे अर्ज नोदणी प्रलंबित असल्याने सन 2022-23 चे नवीन अर्ज व नुतनीकरण (Fresh / Renewal ) व सन 2021-22 चे नोंदणीकृत केलेले अर्ज Re- apply करण्याची मुदत 30 मे 2023 पर्यंत देण्यात आलेली आहे. तरी सर्व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिष्यवृत्तीचे कामकाज पाहणारे कर्मचारी व शिष्यवृत्ती धारक पात्र विद्यार्थी यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरुन मंजूरीसाठी या कार्यालयास प्रथम प्राधान्याने विहीत मुदतीत ऑनलाईन सादर करण्याचे आवाहनही आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close