Shekar Patil Maqheshwari Infra 1
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्र

आरोग्य सेवेत नोकरीचे आमिष : बनावट नियुक्तिपत्रे देवून 3 जिल्ह्यातील युवकाची फसवणूक

मसूर प्रतिनिधी| गजानन गिरी
आरोग्यसेवक पदाची नोकरी लावतो, असे म्हणून फसवणूक करणाऱ्या दोघांना उंब्रज पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, या संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य संशयित सागर पवार याच्या अटकेसाठी विशेष पथक नेमण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी सांगितले. निहाल युनूस पिरजादे इनामदार (वय- 24), ज्ञानेश्वर साळुंखे (वय- 42, दोन्ही रा. पिंपरी, ता. कोरेगाव) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

Sunil Bamane

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंब्रज पोलिस ठाण्यात 8 नोव्हेंबर 2022 रोजी फसवणुकीच्या दाखल गुन्ह्यामध्ये अमोल मधुकर घोलप (वय- 35, रा. निगडी, ता. कराड), सम्राट श्रीमंत नलवडे (रा. गमेवाडी, चाफळ, ता. पाटण), अमोल कुमावत (रा. नाशिक), सुरेश यमगर (रा. कवठे महांकाळ, जि. सांगली) यांना आरोग्यसेवक या पदावर नोकरीस लावतो, असे म्हणून त्यांच्याकडून 10 लाख 22 हजार रुपये घेऊन बनावट नियुक्तिपत्रे देऊन फसवणूक केल्याबाबत रोहित ऊर्फ सागर सदाशिव पवार (रा. पिंपरी, ता. कोरेगाव), निहाल युनूस पिरजादे इनामदार, विक्रम चव्हाण व ज्ञानेश्वर साळुंखे (सर्व रा. पिंपरी, ता. कोरेगाव) यांच्या विरुद्ध उंब्रज पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उंब्रज ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आबा जगदाळे करीत आहेत.

Sunil Bamane

गुन्ह्याचा कसून तपास करून व सबळ पुरावे गोळा करून यातील संशयित निहाल पिरजादे इनामदार, ज्ञानेश्वर साळुंखे यांना उंब्रज पोलिसांनी अटक करण्यात यश मिळविले. गुन्ह्यातील मुख्य संशयित सागर पवार व विक्रम चव्हाण यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालय यांनी फेटाळल्याने त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार असून, त्याकरिता विशेष पोलिस पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही फरारी संशयिताबाबत कोणाला माहिती असल्यास कळवावे, असे आवाहन सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड यांनी केले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close