Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यानोकरी संदर्भपश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसांगली

गाैतमी पाटील येणार असल्याने एसटी चालकाचा सुट्टीचा अर्ज : सत्यता आली समोर

सांगली | गाैतमी पाटील गावात येणार म्हणून दोन दिवस रजा मिळावी, असा एका एसटी कर्मचाऱ्याचा अर्ज सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. याबाबत संबधित एसटी कर्मचारी तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव एसटी आगाराने स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे या अर्जाची सत्यता पुढे आली आहे.

ADvt CM Patan

सदरचा अर्ज तासगाव एसटी डेपोतील चालकाचा एक रजेचा अर्ज व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी पाटील साठी त्यांनी सुट्टी मागितल्याच कारण लिहिलं असल्याचं मजकूर आहे. पण सदरचा व्हायरल केलेला रजेचा अर्ज कोणीतरी खोडसाळपणाने लिहून व्हायरल केला आहे. त्यावरील सही देखील बोगस आहे.

अर्जावर प्रकाश रामचंद्र यमगर असे चालकाचे नाव आहे. तसेच एसटी तासगाव एसटी आगाराकडे अशा प्रकारचा यमगर यांचा कोणताही रजेचा अर्ज आला नसल्याचे स्पष्टीकरण तासगाव आगारकडून देण्यात आले आहे. सध्या अर्जामुळे चांगलीच लोकांची करमणूक होत असून सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close