Hello News 2026 Ganpati Arati Book
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

कवठे येथील जोतिर्लिंग विद्यालयाचा दहावीचा 100 टक्के निकाल

मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
कवठे (मसूर ता. कराड) येथील श्री जोतिर्लिंग विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षा मार्च 2023 चा निकाल 100 टक्के लागला असून या विद्यालयाची विद्यार्थिनी कु. श्रावणी जगन्नाथ साळुंखे हिने 91.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला.

कु. श्रेया प्रकाश साळुंखे हिने 90.20 टक्के गुण मिळवून व्दितीय, कु. मानसी संजय यादव हिने 89.00 टक्के गुण मिळवून तृतीय, कु. शिवांजली शशिकांत शेलार हिने 88.80 टक्के गुण मिळवून चतुर्थ तर कु. श्रावणी भिकू यादव हिने 87.00 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकविला. या विद्यालयाचे 31 पैकी 15 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य श्रेणी प्राप्त केली असून 14 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. तर दोन विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनींचे शाम-शरद शिक्षण प्रसारक संस्था कवठेचे अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कवठे, नवीन कवठे, केंजळ ग्रामस्थ व आजी माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close