kota acadamy karad
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

Karad : दारूच्या कारणावरून हॉटेल तोडफोड करणाऱ्या 8 जणांवर गुन्हा

कराड | येथील कृष्णा कॅनॉलवरील हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी 8 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस संजय पाटील (रा. गजानन हौसींग सोसायटी, कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली. संग्राम सकट, मोन्या सकट, सुरज सकट, धनाजी सकट, अनिल गायकवाड, ओंकार माने यांच्यासह अन्य दोघांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

Kota Academy Karad

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गजानन हौसींग सोसायटीत राहणाऱ्या तेजस पाटील यांचे कृष्णा कॅनॉल चौकात ‘हॉटेल हर्ष एक्झिक्युटीव्ह’ नावाचे हॉटेल आहे. तसेच त्याशेजारीच त्यांचे देशी दारुचे दुकान आहे. शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रोहित सकट हा त्याठिकाणी दारु पिण्यासाठी गेला होता. त्यावेळी पैसे देण्याच्या कारणावरुन वाद झाला. या वादाबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या.

या वादावादीच्या कारणावरुन चिडून जाऊन रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास 8 ते 10 जणांचा जमाव हॉटेलमध्ये घुसला. त्यांनी दगड, लाकडी दांडक्याने हॉटेलची तोडफोड केली. तसेच तेजस पाटील यांच्यासह तेथील कामगारांना मारहाण केली. याबाबत तेजस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close