ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

जिल्हा वार्षिक योजनेतील कामाची वर्क ऑर्डर तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

सातारा |  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत दायित्व निधी मागणी  व  नवीन कामांचे प्रस्ताव लवकरात लवकर मान्यतासाठी सादर करावेत. प्रशासकीय मान्यता घेवून ऑगस्ट 2023 पर्यंत कामाची वर्क ऑर्डर तयार ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
Kota Academy Karad
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र) सन 2023-24 अंतर्गत आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. डूडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या गावांमध्ये अंगणवाडीला स्वत:ची इमारत नाही, अशांची यादी तयार करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डूडी म्हणाले, ज्या ठिकाणी जागेची अडचण असल्यास त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात यावा. तसेच जिल्हा परिषदेंच्या शाळा परिसर मध्ये अंगणवाडीसाठी जागा उपलब्ध आहे, का याची तपासणी करावी.
Brilliant Academy
जिल्हा परिषद शाळांसाठी क्रीडांगण व व्यायाम शाळा निर्माण करावयाची आहेत. त्याचे प्रस्तावही शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी जिल्हा क्रिडा अधिकारी यांचेकडे तात्काळ द्यावेत. प्रशासकीय मान्यतेची  कार्यवाही जलदगतीने करावे. ज्या विभागांनी प्रशासकीय मान्यता घेतली नाही अशा विभाग प्रमुखांची पुन्हा  20 जुलै 2023 बैठक घेण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी यावेळी सांगितले. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्र)  सन 2023-2024  अंतर्गत मंजूर तरतूद,  सन 2022-2023 आणि त्या पूर्वीचे दायित्व  व 2023-24 अंतर्गत प्रशासकीय मंजुरी व निधी वितरणासाठी सादर केलेल्या प्रस्तावांचाही आढावा घेण्यात आला.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker