ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

ब्रिलियंट कॉलेजच्या 7 विद्यार्थ्यांना (IIT) आयआयटीमध्ये प्रवेश

कराड | राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील ब्रिलियंट अकॅडमी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, कराडच्या विद्यार्थ्यांनी जेईई (JEE) ॲडव्हान्सड परीक्षेत अतिशय उत्तुंग यश संपादित केले आहे. व त्यांचा आयआयटी (IIT) मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत ब्रिलियंटच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

Brilliant Academy

ब्रिलियंट अकॅडमीच्या फक्त कराड येथील एकाच शाखेतून पुढीलप्रमाणे ः-  श्रेया पाटील एआयआर 1613 (खुला प्रवर्ग), स्वराज जाधव एआयआर 1676 (ईडब्ल्यूएस), स्नेहल चव्हाण एआयआर 1834 (एस सी), प्रणव खोंडे एआयआर 2049 (एस सी), रोहित बनकर एआयआर 3220 (खुला प्रवर्ग), कल्पेश पाटील एआयआर 3629 (खुला प्रवर्ग), आशिष दोन्ध एआयआर 3553 (ओबीसी) या यशस्वी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कराड येथील ब्रिलियंट अकॅडमी व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्रिंसिपल रुपाली मोहन पाटील, श्रीमती सिंधुताई शिक्षण प्रसारक संस्था मलकापूरचे अध्यक्ष श्री. मोहन पाटील, ब्रिलीयंट अकॅडमीचे डायरेक्टर आदित्य रंजन, केमेस्ट्री विभागाचे एचओडी निलेश कुमार व कोपर्डे हवेलीचे केंद्र प्रमुख मधुसूदन सोनावणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांच्या जेईई (JEE) ॲडव्हान्सडच्या तयारीसाठी देखील दररोज वर्ग सुरु होते. जेईई ॲडव्हान्सडची तयारी करून घेऊन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आयआयटी मध्ये प्रवेश मिळवून देणारी ही कराड मधील एकमेव अकॅडमी आहे. या कॉलेजचे मागील शैक्षणिक वर्षी जेईई ॲडव्हान्सड पास होऊन 7 विद्यार्थी आयआयटी मध्ये प्रवेशित आहेत. कारण जेईई ॲडव्हान्सडचे कराड मध्ये केवळ याच ठिकाणी अध्यापन चालते. जेईई मेन्स व ॲडव्हान्सड साठी स्वतंत्र व कायमस्वरूपी स्टाफ, प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी 11 वी पासूनच नियमित अध्यापन, दररोज चालणारा 5 ते 6 तास स्टडी व डाउट सेशन, नियमित टेस्ट, दर्जेदार स्टडी मटेरियल, वैयक्तिक लक्ष, मर्यादित विद्यार्थी संख्या ई. मुळे केवळ ब्रिलियंट चे विद्यार्थी एवढे उत्तुंग यश संपादित करू शकत आहेत.

उज्वल निकालाची परंपरा असणारी ब्रिलियंट अकॅडमी
या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या खात्रीशीर पायाभरणीसाठी 8 वी ते 10 वी ब्रिलियंट पब्लिक स्कूल, कराडची सुरुवात झाली असून पहिल्याच वर्षी प्रचंड प्रतिसाद असून मोजकेच प्रवेश शिल्लक आहेत. तसेच 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट विकेंड फाऊंडेशनची सोय देखील आहे. लवकरच कॉलेज व स्कूलचे स्वतः च्या जागेत स्थलांतर होत आहे. इयत्ता 8 वी ते 12 वी च्या वर्गासाठी प्रवेश सुरु असून पालकांनी आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी, निकालाची परंपरा हमखास असणाऱ्या जिल्ह्यातील या अकॅडमी, पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये प्रवेश घेऊन निश्चिन्त व्हावे, असे आवाहन संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker