kota acadamy karad
ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

मन शांत राहण्यासाठी योग सर्वाेत्तम मार्ग : प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे

कराड | पतंजली योग समिती, कराड व महिला मंडळ, कराड यांचे संयुक्त विद्यमाने कराड अर्बन बँक हाॅल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सुमारे 70 साधकानी सहभाग घेतला. यावेळी योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांची उपस्थिती होती.

Kota Academy Karad

योग शिबिरास तहसीलदार विजय पवार, सैदापूरचे मंडल अधिकारी पंडित पाटील, ओंकार पाटील यांच्यासह योग साधक उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी म्हणाले, शरीर तंदुरस्त राहण्यासाठी आणि मन शांत राहण्यासाठी योग हा सर्वाेत्तम मार्ग आहे. तेव्हा धकाधकीच्या जीवनात माणसाच्या आयुष्यातील योग हा एक व्यायाम नव्हे तर सवय बनली पाहिजे, जेणेकरून आयुष्य सुंदर होईल.

Brilliant Academy

यावेळी मीना घळसासी, पूनम पटेल, ज्योती दंडवते व गजानन कुसूरकर यांनी योग प्रात्यक्षिके दाखवली. या शिबिरास ओम सेवा केंद्र व अर्बन बँक,कराड यांचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूनम पटेल यांनी केले. स्वागत सौ. प्रभूमिराशी यांनी व आभार सौ.सरिता गायकवाड यांनी केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close