अहमदनगरउत्तर महाराष्ट्रकोकणकोल्हापूरताज्या बातम्याधार्मिकपश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगमराठवाडामुंबईराजकियराज्यविदर्भसांगलीसातारासामाजिकसोलापूर

एकनाथ शिंदे ‘असे’ आषाढीला जाणारे पहिलेच मुख्यमंत्री

पंढरपूर | आषाढी वारीला शासकीय पूजेसाठी आजपर्यंत राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री येत असतात. परंतु सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी विमा जाहीर केलाच परंतु त्याचबरोबर हे पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत, ज्यांनी आषाढी वारीच्या काळात दोनवेळा पंढरपूरला भेट दिली असल्याची माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली.

Brilliant Academy

पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेसाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नियोजित कार्यक्रमात श्री. औसेकर महाराज बोलत होते. पुढे ते म्हणाले, आषाढी वारीत नियोजन पहायला सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत असलेले पहायले आहे. परंतु, आषाढी वारीची पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी येणारे पहिले मुख्यमंत्री श्री. शिंदे साहेब आहेत. मुख्यमंत्री आले अन् ते गोपाळपूरला गेले, तेथून कृष्णनगरला गेले. तेथून ते वारीत गेले. एका वारकऱ्यांने सांगितले उष्णता होतेय, लगचे कलेक्टरांना सांगून कुलर लावण्याच्या सूचना दिल्या. अतिशय आनंदी आणि शिस्तीची झाली. सर्व वारकऱ्यांना अपघाती विमा देण्याचा निर्णय उपक्रम घेतला. वारकऱ्यांची तळमळ असणारा मुख्यमंत्री आहे. त्यानंतर आज शासकीय पूजेला आठ दिवसात दुसऱ्यांदा पूजेला आलेले आहेत. आता माघी आणि चैत्री यात्रेला 5 लाखांच्यावर वारकरी येत असतात. तेव्हाही वारकऱ्यांना अपघाती विमा जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

Kota Academy Karad

पंढरपूसाठी कोटीत निधीची मुख्यमंत्र्याकडून घोषणा
राज्यात बरेच काही येत- जात होते, परंतु पांडुरंगाच्या आशिर्वादाने सर्वकाही ठिकठाक आहे. अडीच वर्षात थांबलेली विकास कामे थांबली होती, त्यांना चालना देण्याचे काम आम्ही केले आहे. विकास आराखडा सर्वांना सोबत व सर्वांचे विचार घेवून त्यांचा निर्णय घेतला जाईल. विठ्ठल- मंदिराच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयी- सुविधा मिळणार असल्याचा जीरच मुख्यमंत्र्यांनी सोबत आणला होता. पंढरपूर नगरपरिषदेला 108 कोटीची नगरोत्थानमधून मान्यता दिली. शहरासाठी पाणी पुरवठा योजनेलाही मान्यता. मंदिरातील अंतर्गत कामासाठी 73 कोटी रूपये मंजूर.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close