Hello News 2026 Ganpati Arati Book
क्राइमताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारासोलापूर

परजिल्ह्यातील शस्त्रे विकणाऱ्या तस्करांना कोरेगाव तालुक्यात अटक

सातारा | कोरेगाव तालुक्यातील सातारारोड येथील बसस्थानक परिसरात परजिल्ह्यातील शस्त्रे विकणारे तस्करांना अटक करण्यात आली आहे. तस्करांकडून 2 पिस्टल व 7 जिवंत काडतूस असा एकूण 2 लाख 67 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सहाय्यक पोलीस निरिक्षक सखाराम बिराजदार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सातारारोड (ता. कोरेगाव) गावच्या हद्दीत एस्टीस्टॅन्ड परिसरात आदर्श घैनिनाथ हुलगे व रणजित नवनाथ सांळुखे (दोघेही रा. करमाळा, जि. सोलापूर) हे विनानंबरचे लाल काळ्या रंगाचे गाडीवरून संशयीतरित्या फिरत असून ते बनावट पिस्टल विक्रीसाठी आले आहेत. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा लावून दोन इसमांना ताब्यात घेऊन 2 देशी बनावट पिस्टल 7 जिवंत काडतूस तसेच लाल काळे रंगाची विनानंबर प्लेट असलेली हिरो कंपनीची मोटारसायकल असा एकूण 2 लाख 67 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक बापू बांगर व कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी राजेद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरिक्षक सखाराम बिराजदार, पोलीस उपनिरिक्षक गणेश माने, पो हवा ज्ञानदेव साबळे, पो. ना जोतिराम शिंदे, पो. ना विक्रांत लावंड, पो. कॉ प्रमोद जाधव, पो.कॉ समाधान शेडगे, पो. कॉ गणेश शेळके, पो. कॉ गणेश भोंग पो. कॉ. हेमंत सोनमळे, पो.कॉ सचिन लावंड यांनी सदरची कारवाई केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close